Ladki Bahin Yojana : मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. मध्यप्रदेश मध्ये सुरू असणाऱ्या लाडली बहना योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पक्ष प्रणित राज्यातील शिंदे सरकारने ही योजना महाराष्ट्रातही चालू करण्याचा निर्णय घेतला.
मध्यप्रदेश मध्ये लाडली बहना योजनेअंतर्गत तेथील पात्र महिलांना दरमहा बाराशे रुपये दिले जातात. मात्र महाराष्ट्रात सुरू झालेल्या शिंदे सरकारच्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात.
म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाणार आहे.
विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र राहतील. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी अर्ज सादर केले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे जवळपास दीड लाखाहून अधिक महिलांना या योजनेचा प्रत्यक्षात लाभही मिळाला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
यामुळे आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पुढील हफ्त्याची आतुरता लागली आहे. अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या लाभार्थीचे बँक अकाउंट आधार सोबत लिंक असेल अन ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी(DBT) एनेबल असेल अशा लाभार्थ्यांना या योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार आहे. म्हणजेच आतापर्यंत ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत त्या महिलांना आता आणखी पंधराशे रुपयांची भेट मिळणार आहे.
हे पैसे आज किंवा उद्या पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र अधिकृत वेबसाईटवर अजून या संदर्भात कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. परंतु शिंदे सरकारने लवकरच या योजनेचा पुढील हप्ता जमा होणार अशी माहिती दिली असल्याने आज, उद्याला या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असे म्हटले जात आहे.