Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेची सुरुवात नुकत्याच काही दिवसांपूर्वी झाली आहे. ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ दिला जात असून आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्यात आले आहेत. राज्यातील जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना या योजनेचे दोन हप्ते मिळाले असून आता या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची महिलांना आतुरता लागली आहे.
महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा तिसरा हप्ता 19 सप्टेंबर पासून पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तथापि अनेकांना अजून या योजनेचा तिसरा हप्ता मिळालेला नाही.
अशा परिस्थितीत, आज आपण जर लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही तर याची तक्रार कुठे करावी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले नाही तर त्यांनी काय करावे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पैसे मिळाले नाहीत तर तक्रार कुठे करणार?
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ‘महाराष्ट्रवादी’ व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरु केली आहे. या Whatsapp हेल्पलाइन सेवेअंतर्गत या योजनेच्या लाभार्थी महिलेला 9861717171 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजने संदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगता येत आहेत.
महत्वाचे म्हणजे या समस्या अवघ्या काही तासांच्या आतच सोडवल्या जात आहेत. लाडक्या बहिणीने आपल्या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासांच्या आत त्यांच्यासोबत संपर्क साधला जातो.
मग लाडक्या बहिणीच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या जातात. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की या नंबर वर आपली समस्या Whatsapp द्वारे कशी मांडायची? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही प्रक्रिया सर्वसामान्य महिला वर्गाला समजावी यासाठी खूपच सोपी बनवली गेली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया मराठी मध्ये आहे. यासाठी तुम्हाला वर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचे आहे. तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी गोष्टी निवडायच्या आहेत. ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडायची आहे.
योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडायचा आहे. समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करायची आहे. अशा तऱ्हेने तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पक्षाकडून तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न होईल.
याशिवाय महिलावर्ग 181 या हेल्पलाइन क्रमांक वर देखील आपली तक्रार मांडू शकता. किंवा अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून तुम्ही या योजनेबाबत तक्रार दाखल करू शकता. तुम्हाला नारीशक्ती दूत या एप्लीकेशन वर देखील तक्रार करता येऊ शकते.