Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत असणारी योजना. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय योजना आणि आत्तापर्यंतची सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी योजना म्हणून या योजनेला ओळखलं जातं. या योजनेचा देशभरातील कोट्यावधी महिलांना लाभ मिळतोय.
या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा होत आहेत. प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची रक्कम या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात जमा होत असून आत्तापर्यंत सहा महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये क्रेडिट झालेले आहेत.
जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. असे असतानाच आता या योजनेच्याबाबतीत एक नवी चर्चा सुरू झाली आहे. या योजनेचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
त्यामुळं आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचंही बोललं जात आहे. यापार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
आज फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची आता पडताळणी होणार आहे, अशी माहिती दिली. तसंच शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अर्ज सरसकट बाद होणार नाहीत पण ज्यांच्या घरामध्ये दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अस त्यांनी यावेळी म्हटलें आहे.
आधारकार्डची माहिती जुळत नसेल किंवा नोकरीला असलेल्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहिण योजना चर्चेत आली आहे.