Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. खरेतर गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरू होणार अशी चर्चा होती. मध्यप्रदेशमध्ये सूरु असणाऱ्या लाडली बहना योजनेचा अभ्यास करण्यासाठी मध्यँतरी राज्य शासनाने एक समिती देखील मध्य प्रदेशमध्ये पाठवली होती.
दरम्यान या समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात जाहीर झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आता प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजे एका वर्षात 18 हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. मध्य प्रदेशमध्ये सुरू असणाऱ्या योजनेअंतर्गत तेथील महिलांना महिन्याला फक्त बाराशे रुपये मिळतात, पण शिंदे सरकारने या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. 31 ऑगस्ट अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ मिळणार आहे.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र राहणार आहेत. यासाठी अर्ज करण्यास आणखी एक महिन्याचा काळ बाकी आहे. पण, अर्ज करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत असल्याने अर्ज भरताना माहिती चुकण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा करू असे आश्वासन दिले आहे. पण याचा अर्ज भरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या योजनेचा अर्ज भरताना झालेली एक साधी चूकही चांगलीचं महागात पडू शकते.
खरेतर संजय गांधी निराधार योजनेत अनेक महिलांनी बँकेची माहिती चुकीची भरली होती. यामुळे अनेक लाभार्थ्यांचे पैसे चुकीच्या माहितीमुळे भलत्याच व्यक्तीला मिळत आहेत. याबाबत तहसील कार्यालयात किंवा बँकेत लाभार्थी खेटे मारत आहेत पण तरीही यात सुधारणा होत नाहीये.
तुम्ही सुद्धा अशी अनेक उदाहरणं पाहिले असतील. यामुळे लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतही असे घडू नये यासाठी बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. यामुळे महिलांनी बँकेचा खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचं नाव आणि शाखा अशी सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
या माहितीमध्ये जर काही मिस्टेक झाली तर तुमचे पैसे एकतर दुसऱ्यांच्या खात्यात जातील किंवा मग तुम्हाला लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच या योजनेसाठी आवश्यक असणारे हमीपत्र देखील काळजीपूर्वक भरायचे आहे. यामध्ये चूक झाली तरी देखील तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.