Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. ही योजना नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. यासाठी एक जुलैपासून अर्ज स्वीकारले जात आहेत.
पण, राज्यातील पात्र महिलांना यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ दिला जाणार आहे.
ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांचा लाभ मिळत नाही त्या महिलांना या अंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र राहणार आहेत.
फक्त महाराष्ट्रातील महिलांनाचं याचा लाभ मिळणार आहे. तथापि ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि त्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिलांनाही याचा फायदा होणार आहे.
खरे तर या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी अर्ज सादर केले आहेत. मात्र अनेक महिलांनी या योजनेसाठी घाईघाईने अर्ज सादर केले असून यामुळे अर्ज भरताना चुका देखील झाल्या आहेत.
जर एखाद्या महिलेने चुकीचा अर्ज सादर केला असेल तर त्या महिलेचा अर्ज बाद होणार आहे. पण, तुमचा अर्ज चुकलेला असेल तरीही घाबरण्याचे काही कारण नाही. कारण की सरकारने या अर्जात एकदा बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदान कार्ड सारखें कागदपत्र काळजीपूर्वक अपलोड करायचे आहेत. या डॉक्युमेंट्ची दोन्ही बाजू अपलोड करायची आहे.
जर तुम्ही याची एकच बाजू अपलोड केली तर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान जर तुमचीही अशीच चूक झाली असेल तर अर्ज रद्द होण्याच्या अगोदर म्हणजेच पेंडिंग मध्ये असतानाच हा अर्ज दुरुस्त करून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
कारण की, अर्ज एडिट करण्याचा पर्याय आता उपलब्ध झालेला आहे. खरे तर हे अर्ज नारीशक्ती दूत या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून भरले जात आहेत. म्हणून जर अर्ज दुरुस्त करायचे असतील तर तुम्हाला नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन अपडेट करावे लागणार आहे.
तथापि, अर्ज दुरुस्त करताना विशेष काळजी घ्या कारण की अर्ज दुरुस्तीचा पर्याय हा एकदाच उपलब्ध होणार आहे. जर योग्य पद्धतीने अर्ज दुरुस्त केला नाही तर अशा प्रकरणांमध्ये अर्ज बाद होण्याची भीती आहे.