Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी देखील खूपच खास ठरणार आहे. खरे तर लाडकी बहिण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. याचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना मिळतोय. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जात आहे.
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या अनेक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत. जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये गेल्या महिन्यात मिळाले आहेत.
ज्या महिलांना या योजनेचे पहिले दोन हप्ते म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळाले आहेत त्या महिलांच्या माध्यमातून आता या योजनेचा तिसरा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान आता याच संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे.
केव्हा जमा होणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता?
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर 2024 ला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न होणार असून याच महत्त्वाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
याच बैठकीत या योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता काही मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे.
जर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 29 सप्टेंबरला पुढील हप्ता जमा करण्याचे ठरले तर यासाठी रायगडला एक भव्य कार्यक्रम सुद्धा आयोजित होऊ शकतो अशी ही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
या कार्यक्रमासंदर्भात देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. नक्कीच जर 29 तारखेला पुढील हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला तर त्यांना या निमित्ताने सणासुदीच्या दिवसात मोठा आर्थिक आधार मिळणार आहे