Ladki Bahin Yojana : तुम्हीही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे का ? अहो मग तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर जेव्हापासून या योजनेची घोषणा झाली आहे तेव्हापासूनच ही योजना चर्चेत आहे. या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
अर्थातच दरवर्षी या योजनेच्या एका पात्र महिलेला 18 हजाराचा लाभ मिळणार आहे. यासाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र राहणार आहेत. याचा लाभ फक्त राज्यातील महिलांना मिळणार आहे.
मात्र ज्या महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे आणि जिने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशी महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहे. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत.
यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यामुळे सध्या महिला वर्गात योजनेचे अर्ज भरण्यासाठी मोठी धावपळ पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता याच योजने संदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी आत्तापर्यंत एक कोटी महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत.
विशेष म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत असल्याने ही संख्या आणखी वाढणार आहे. सरकारने या योजनेचा राज्यातील जवळपास दोन कोटी महिलांना लाभ मिळू शकतो असा दावा केला आहे.
दुसरीकडे सरकारने आता या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार याची तारीख जाहीर केली आहे.
आज शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 17 ऑगस्टला जमा करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यासाठी राज्यातील शिंदे सरकारच्या माध्यमातून एक मोठा भव्य असा कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.
अर्थातच हा सोहळा मोठा भव्य बनवला जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याच्या ठिकाणी यासाठी मोठा भव्य सोहळा आयोजित करणार आहेत.
एकंदरीत महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून 17 ऑगस्ट 2024 ला लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचे गिफ्ट मिळणार हे स्पष्ट झाले आहे.