Ladki Bahin Yojana Ration Card : महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकारने मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. मध्यप्रदेश राज्यात लाडली बहन योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत तेथील महिलांना प्रत्येक महिन्याला बाराशे रुपये दिले जात आहेत. दरम्यान, याच योजनेच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली.
ही योजना एक जुलैपासून सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. अर्थातच राज्यातील महिलांना एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ राज्य सरकारकडून दिला जाणार आहे.
यासाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी सरकारने 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत दिली आहे. मात्र या योजनेसाठी सरकारने काही निकष आणि अटी लावलेल्या आहेत.
या अटींमुळे काही महिला पात्र असूनही अपात्र ठरतील अशी भीती व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर 12 जुलैला सरकारने या योजने संदर्भात एक मोठा निर्णय घेतला असून एक सुधारित जीआर काढला आहे. यानुसार, या योजनेचे काही निकष शिथिल करण्यात आले आहेत.
परिणामी आता राज्यातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता ज्या महिलेचे नाव रेशन कार्ड वर नसेल त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळवता येणे शक्य होणार आहे.
रेशन कार्डवर नाव नसेल तर कोणते डॉक्युमेंट द्यावे लागणार
खरंतर, नवविवाहित महिलेचे लगेचच रेशन कार्ड वर नाव ऍड करणे शक्य बाब नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून अशा महिला वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती.
अशा परिस्थितीत सरकारने आता या योजनेच्या या महत्त्वपूर्ण अटीत शिथिलता दिली आहे. सरकारने आता ज्या महिलेचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल त्या महिलेचे विवाह नोंदणीपत्र किंवा पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
कोणत्या महिलांना मिळणार लाभ
लाडकी बहिण योजनेचे 1,500 रुपये फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी महिलांना मिळणार आहे. या अंतर्गत राज्यातील विवाहित, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत, निराधार महिलांना लाभ मिळणार आहे. फक्त 21 ते 65 या वयोगटातील महिलाच यासाठी पात्र राहणार आहेत.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र राहतील. ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन नसणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र राहतील.
याचा लाभ थेट महिलांच्या बँक खात्यात वर्ग होणार असल्याने महिलेचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे. ज्या महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल, पण तिने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर अशा महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे.