Ladki Bahin Yojana : मध्यप्रदेश राज्यात नुकत्याच काही महिन्यांपूर्वी ‘लाडली बहना’ योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना सुरू झाल्यानंतर तेथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळवता आला. यामुळे मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातही ही योजना सुरू केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. या योजनेला राज्यातील महिलांकडून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
आतापर्यंत या योजनेसाठी कोट्यावधी महिलांनी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे देखील मिळाले आहेत.
एक कोटीहून अधिक महिलांना या योजनेचे पैसे दिले गेले आहेत. पण ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे अशा महिलांना अन जुलैमध्ये अर्ज केलेल्या पण अर्जात काही चुका असणाऱ्या महिलांना या योजनेचे पैसे अजून मिळालेले नाहीयेत.
पण, सरकार 31 ऑगस्ट पासून उर्वरित पात्र महिलांना सुद्धा पैसे देणार आहे. ज्या महिलांनी 31 जुलै नंतर आणि 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेसाठी अर्ज केलेले असतील अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे 4500 रुपये दिले जाणार आहेत.
तसेच, ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केलेला असेल मात्र कागदपत्रे चुकीची अपलोड केलेली असतील तर त्यांना चुका दुरुस्त केल्यानंतर तिन्ही महिन्यांचा लाभ दिला जाणार आहे.
आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक चुकीचा टाकलेला असेल किंवा इतर काही चुका झाल्या असतील म्हणून ज्यांना पैसे मिळालेले नाहीत अशा महिलांना सरकारने पुन्हा एकदा रिसबमिटचा ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे.
त्यामुळे आता या महिलांनी पुन्हा एकदा फॉर्म भरून अपलोड करायचा आहे. पण लक्षात ठेवा अशा महिलांना अर्ज दुरुस्त करण्यासाठी, एडिट करण्यासाठी एकदाच संधी मिळणार आहे. यामुळे हा अर्ज काळजीपूर्वक दुरुस्त करायचा आहे आणि मगच सबमिट करायचा आहे.
हा अर्ज सबमिट झाल्यानंतर मग अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात तिन्ही महिन्यांचे 4500 रुपये दिले जाणार आहेत. पण, ज्या महिलांच्या अर्जात दुरुस्ती करायची आहे त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत हे काम करणे आवश्यक आहे. हे काम केले तरच सप्टेंबर महिन्यात चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.