Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजने संदर्भात नुकताच शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. तो म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्यास आता मुदत वाढ देण्यात आलीये. आतापर्यंत 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केल्यास 2 महिन्यांचे पैसे मिळणार असे सांगितले गेले होते. पण आता अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे.
ज्या महिलांचे या योजनेसाठी अर्ज भरायचे राहिले आहेत किंवा ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील त्यांच्यासाठी ही मुदत वाढविण्यात आली आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
काल अर्थातच गुरुवार 15 ऑगस्ट 2024 ला कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली.
खर तर सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाताय. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट च्या सायंकाळी या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि 15 ऑगस्ट ला सकाळी चार वाजता लाखो महिलांना या योजनेचे पैसे मिळालेत.
मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 80 लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळाले आहेत. आतापर्यंत एक कोटीहून अधिक अर्ज मंजूर झाले आहेत. या योजनेसाठी मंजूर झालेल्या उर्वरित अर्जदार महिलांच्या खात्यातही रक्षाबंधनाच्या आधी पैसे जमा केले जाणार आहेत.
यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर पर्यंत या योजनेला मुदत वाढ दिली आहे. शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची मुदत आम्ही सप्टेंबरपर्यंत वाढवली असल्याची मोठी घोषणा केली आहे.
तसेच, येत्या १७ तारखेपर्यंत योजनेचे दोन महिन्यांचे एकत्रित हप्ते असे एकूण ३,००० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती दिली आहे.
नक्कीच योजनेला मुदतवाढ मिळाली असल्याने अजूनही ज्या महिलांनी अर्ज केलेले नसतील त्या सर्व महिलांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.