Ladki Bahin Yojana News : लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसात जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. पण जानेवारी महिन्याच्या हफ्त्यात 1500 मिळणार की 2100 हा प्रश्न आहे. मंडळी, सध्या गेल्या वर्षी सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर आम्ही हा हप्ता 2100 चा करू असे आश्वासन दिले होते.
यामुळे महायुतीचे सरकार स्थापित झाल्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत 2100 रुपये मिळतील असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात फडणवीस सरकारने डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचाचं दिला.
आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीच्या आधी म्हणजेच 14 जानेवारीच्या आधीच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जाऊ शकतो. पण हा हप्ता 1500 चा मिळणार की 2100 चा याबाबत लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमावस्था आहे.
दरम्यान आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मकर संक्रांतीच्या आधी दिल्या जाणाऱ्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत यावेळी देखील महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजेच मार्च 2025 नंतर महिलांना २१०० रुपये हप्ता दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील असेच सुतवाच केले आहे. त्यामुळे महिलांना या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात देखील १५०० रुपयांचाच हप्ता दिला जाणार आहे.
कशी आहे लाडकी बहीण योजना?
राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी पात्र आहेत. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतो. ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात रहिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिलांना मात्र याचा लाभ मिळतो.
ज्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे अशा महिलांना याचा लाभ मिळत नाही. परंतु कुटुंबात फक्त ट्रॅक्टर असेल तर या योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना याचा लाभ मिळू शकत नाही.
ज्या महिला पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या दोन्ही योजनांचे पैसे वजा करून लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. कुटुंबात सरकारी विभागात काम करणारे सदस्य असतील तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. आजी-माजी आमदार खासदारांना याचा लाभ मिळणार नाही.