Ladki Bahin Yojana News : महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. जुलै 2024 पासून ही योजना सुरू झाली असून या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत.
म्हणजेच एका पात्र महिलेला या योजनेअंतर्गत आतापर्यंत नऊ हजार रुपयाचा लाभ मिळालेला आहे. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 24 डिसेंबर पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. खरंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे देण्यात आले होते.
नंतर आचारसंहितेमुळे ही योजना स्थगित करण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आणि महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर पुन्हा एकदा लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता गेल्या सहा दिवसांपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जात आहे.
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयांचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होत असून आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे मात्र अजूनही अशा काही महिला आहेत ज्यांना डिसेंबर महिन्याचा लाभ मिळालेला नाही.
अशा परिस्थितीत या महिलांनी काय करायला हवे या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम, महिलांनी आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही याची चौकशी करणे आवश्यक आहे. जर बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर त्यांनी आधार कार्ड लिंक करून घेणे आवश्यक आहे.
महिलांनी आपल्या मोबाईलवर पैसे क्रेडिट झाल्याचा मॅसेज आला आहे की नाही हे चेक करायचे आहे. जर तसा मॅसेज तुम्हाला आलेला नसेल तर तुम्ही बँकेच्या अँप्लिकेशनवर जाऊन किंवा बँकेच्या टोल फ्री क्रमांक वर कॉल करून बँक बॅलन्स चेक करून घ्या.
तसेच, लाभार्थी महिला त्यांच्या जवळील बँकेच्या शाखेत जाऊन त्यांच्या अकाउंट मधील रक्कम तपासू शकतात. जर बँक अकाउंट मध्ये पैसे जमा झालेले नसतील तर लाभार्थी महिलांनी त्यांनी जिथे अर्ज केला आहे त्या ठिकाणी जाऊन याबाबतची चौकशी करायची आहे.