Ladki Bahin Yojana News : महायुती सरकारने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत पैशांचे वितरण सुरू असून आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलें आहेत.
म्हणजेच, एका पात्र महिलेला आतापर्यंत नऊ हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे 24 डिसेंबर 2024 पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून 31 डिसेंबर अखेरपर्यंत सर्व पात्र महिलांना याचा लाभ मिळेल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून यावेळी समोर येत आहे.
खरंतर, लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत मोठी गेमचेंजर ठरली. विधानसभा निवडणुकीत या योजनेवरून मोठ्या प्रमाणात चर्चा देखील रंगल्यात. महाविकास आघाडी कडून निवडणुका झाल्यात की ही योजना लगेच बंद केली जाईल असा दावा करण्यात आला होता.
त्यामुळे निवडणुकीनंतर या योजनेचा सहावा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार हा सवाल होता आणि महिलांना धाकधूकही वाटत होती. मात्र महायुतीने सातत्याने ही योजना कधीच बंद पडणार नाही उलट या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशांमध्ये आम्ही भविष्यात वाढ करू असे म्हटले गेले होते.
महायुतीने या योजनेअंतर्गत भविष्यात 2100 रुपये देऊ अशी ग्वाही दिलेली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजेच नवीन वर्षात जो अर्थसंकल्प सादर होईल त्या अर्थसंकल्पानंतर या योजनेची रक्कम 2100 रुपये होऊ शकते. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत.
अर्थातच एप्रिल 2025 पासून या योजनेची रक्कम 2100 रुपये होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान आता या योजनेच्या संदर्भात एक नवीन लेटेस्ट माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अर्थातच सातवा हप्ता जानेवारी महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
आनंदाची बातमी अशी की या योजनेचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची योजना फडणवीस सरकारने आखलेली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत.
संक्रातीआधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांची यंदाची संक्रात गोड होणार आहे. दरम्यान,याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे संक्रांतीच्या आधी या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.