Ladki Bahin Yojana News : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली असून या अंतर्गत आत्तापर्यंत पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत.
जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच या योजनेच्या एका पात्र महिलेला आत्तापर्यंत 7500 रुपयांचा लाभ मिळाला आहे.
काल विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या आहेत आणि येत्या 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान या निकालाच्या आधीच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवले जाणार आहेत. सध्याच्या पंधराशे रुपयांमध्ये आणखी सहाशे रुपयांची वाढ केली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी 14 नोव्हेंबरला मोठी घोषणा केली होती. “महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाईल”, असं गोयल म्हणाले होते.
पियुष गोयल यांनी या संदर्भात बोलताना, पुढील पाच वर्षात 21 ते 65 या वयोगटातील प्रत्येक महिलेला दरवर्षी 1.25 लाख रुपये मिळणार आहेत. विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दरमहा 3000 हजार रुपये देण्याचं आणि राज्य परिवहनच्या एसटीत मोफत प्रवासाची सुविधा देणार असल्याचं आश्वासनं दिलंय.
आता महिलांना औपचारिक अर्थव्यवस्थेत नेण्याची आवश्यकता आहे. महायुती महाराष्ट्रात पुन्हा एकदा येईल, असा मला विश्वास आहे असे देखील विधान पियुष गोयल यांनी यावेळी केले. एकंदरीत जर निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारली तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये दिले जातील.
मात्र, यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणे अपेक्षित आहे. यामुळे आता राज्यात 23 तारखेला नेमके काय घडणार, कोणाचे सरकार येणार, लाडक्या बहिणी महायुती सरकारच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत का? या साऱ्या गोष्टी क्लियर होणार आहेत.