मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना, याची सुरुवात जुलै 2023 पासून झाली. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात, ही योजना सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत सहा हप्ते वितरित करण्यात आलेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
म्हणजे ज्या महिलांनी या योजनेचा जुलै महिन्यापासून लाभ घेतलायं त्यांना आत्तापर्यंत नऊ हजार रुपये मिळालेत. डिसेंबरचा हप्ता हा 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात वितरित करण्यात आला. दरम्यान, नवीन वर्षात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्याच्या हफ्त्याबाबत अन 2100 रुपयांचा हफ्ता करणे बाबत मोठी अपडेट समोर आलीये. अशा परिस्थितीत आज आपण लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा पैसा केव्हा मिळणार तसेच 2100 रुपयांचा लाभ देण्याबाबत सरकारची नेमकी काय प्लॅनिंग आहे ? याचाच आढावा आज आपण घेणार आहोत.
मंडळी, सर्वात आधी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत. मीडिया रिपोर्ट नुसार, जानेवारी महिन्याचा हप्ता हा संक्रांतीच्या आधीचं पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अर्थातच 14 जानेवारीच्या आधीच महिलांना याचा लाभ मिळेल, नक्कीच ही महिलांसाठी संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार आहे.
यामुळे लाडक्या बहिणींची मकर संक्रांत यंदा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. दुसरीकडे, महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे जे आश्वासन दिले होते त्याबाबतही महिलांकडून सातत्याने विचारणा होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास 1500 रुपयांऐवजी 2,100 रुपयांचा लाभ दिला जाईल असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, आता मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळणार अशी माहिती दिली आहे. मार्च महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याबाबत निर्णय होणार अन त्या अनुषंगाने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाईल, मग त्यानंतर लाडक्या बहिणींना प्रत्यक्षात 2100 रुपयांचा लाभ मिळेल, असे सांगितले गेले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अर्थसंकल्पानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी आणि सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी योजना. ही योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली. राज्यात सुरू झालेल्या या नव्या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना आर्थिक लाभ दिला जातोय.
महाराष्ट्रातील महिलांना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतोय. आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी हून अधिक महिलांना याचा लाभ देण्यात आला आहे. सध्या या योजनेसाठी नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया बंद आहे. म्हणजेच नवीन अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.
पण, येत्या काही दिवसांत या योजनेसाठी पुन्हा अर्ज स्वीकारले जातील अशी आशा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ दिला जाईल आणि तेव्हापासूनच नवीन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नक्कीच शासनाने हा निर्णय घेतला तर राज्यातील महिला वर्गाला याचा मोठा दिलासा मिळणार आहे.