Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षे अर्थातच 2024 मध्ये सुरू झाली. जुलै 2024 पासून या योजनेचा लाभ मिळतोय. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेतुन जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे 9 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
महत्त्वाची बाब अशी की या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधी म्हणजेच 14 जानेवारीच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीने जे आश्वासन दिले होते त्यानुसार या योजनेचे पैसे 2100 रुपयांपर्यंत केले जाणार आहेत.
मार्च 2025 पासून या योजनेच्या पात्र महिलांना दरमहा 2100 रुपयांचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा प्रसार माध्यमांमध्ये होतोय. असे असतानाच मात्र गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेतून काही महिलांना वगळले जाणार अशा चर्चा सुरू होत्या.
ज्या महिलांकडे स्वतःची स्कूटर आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू होत्या. यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. कारण की या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या बहुतांशी महिलांच्या कुटुंबात दुचाकी वाहन आहे.
अशा परिस्थितीत जर सरकारने हा निर्णय घेतला तर या योजनेच्या अनेक महिला अपात्र ठरतील अशी भीती होती. दरम्यान आता याच संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटल्याप्रमाणे, दुचाकी असलेल्या लाभार्थींना देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे.
कोणालाही वगळले जाणार नाही. खरे तर सोशल मीडियामध्ये दुचाकी असणाऱ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे म्हटले जात होते. म्हणून याबाबत मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे यांनी अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे सर्व लाभार्थींनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत घोषणांवरच लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आदिती तटकरे यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज दूर झाले असून, सर्व पात्र महिलांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळेल, याची खात्री झाली आहे.