Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना अलीकडेचं सुरू झाली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळतोय.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ दिला जातोय. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतोय. या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून दिला जातोय.
महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या ॲडव्हान्स पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. अर्थातच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
अर्थातच ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळतो त्यांना आतापर्यंत 7500 मिळाले आहेत. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भाऊबीजेची ओवाळणी म्हणून शिंदे सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे पात्र लाडक्या बहिणींना आगाऊ देऊ केले आहेत.
यामुळे सध्या लाडक्या बहिणींमध्ये मोठे प्रसन्न वातावरण पाहायला मिळतय. दरम्यान लाडक्या बहिणींचा आनंद आणखी द्विगुणीत करणारी एक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता दिवाळीचा बोनस म्हणून आणखी अतिरिक्त पैसे मिळणार आहेत.
शिंदे सरकार लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दिवाळी बोनस म्हणून 5500 देणार असल्याची बातमी सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यंदा 29 ऑक्टोबर पासून दिवाळी सणाला सुरुवात होत असून याच दिवाळी सणाचे औचित्य साधून शिंदे सरकार लाडक्या बहिणीसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस म्हणून 3000 जमा करणार असल्याची बातमी समोर आली आहे.
हा तीन हजार रुपयांचा बोनस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असून काही निवडक पात्र महिलांना आणि मुलींना अतिरिक्त 2500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच काही निवडक महिला आणि मुलींना तब्बल पाच हजार पाचशे रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे.
विशेष म्हणजे हे पैसे दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त असणार आहेत. नक्कीच जर शिंदे सरकारकडून लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना आणखी पाच हजार पाचशे रुपये मिळालेत तर ही या महिलांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे.
या पैशांमुळे लाडक्या बहिणींची दिवाळी यंदा थाटामाटात संपन्न होईल अशी आशा आहे. तथापि या दिवाळी बोनस संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे सरकार खरंच पात्र महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा करणार का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.