Ladki Bahin Yojana : तुम्हीही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरला आहे आणि या योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या आपट्याचे आतुरतेने वाट पाहत आहात? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे या योजने संदर्भात नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या योजनेची सुरुवात नुकत्याच काही दिवसांपूर्वी झाली असून एक जुलैपासून या योजनेचे अर्ज भरले जात आहेत. 31 ऑगस्टपर्यंत या योजनेचे अर्ज भरण्याची मुदत आहे.
विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या आधीच पैसे दिले जाणार आहेत. 17 ऑगस्ट 2024 ला या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता वितरित होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हे 17 तारखेला वितरित होणार आहेत. तत्पूर्वी सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या आणि ज्यांचा अर्ज स्वीकृत झाले आहेत अशा पात्र महिलांना एक मेसेज पाठवण्यात आला आहे.
त्यामुळे जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमच्या मेसेज बॉक्समध्ये सरकारने पाठवलेला हा मेसेज असेल तर तुम्हाला 17 तारखेला या योजनेचे तीन हजार रुपये मिळणार हे फिक्स आहे.
यासोबतच अर्ज केलेल्या काही महिलांच्या खात्यावर सरकारने एक रुपया जमा केला आहे. ज्या महिलांच्या खात्यावर हा एक रुपया जमा झाला असेल त्या महिलांनाही याचा लाभ मिळणार हे सुनिश्चित झाले आहे.
तुमच्या मोबाईलमध्ये हा मेसेज असेल तर तुम्हाला हमखास लाभ मिळणार
लाडक्या बहिणीसाठी सादर केलेले अर्ज सरकार पातळीवर पडताळले जात आहेत आणि अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यानुसार ज्या महिलांचे अर्ज मंजूर होत आहेत त्या महिलांना सरकारकडून “Your application no (अर्जाचा नंबर) for MMLBY has approved – WCD, GOM – MAHGOV” असा मेसेज पाठवला जात आहे.
जर तुमच्याही मोबाईल मध्ये असा मेसेज आला असेल तर समजून घ्या की तुम्हीही लाडक्या बहिणीसाठी पात्र आहात. येत्या 17 तारखेला तुम्हाला या योजनेचे तीन हजार रुपये मिळणार आहेत.