Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट दिली जाणार आहे. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयाचा आर्थिक लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती.
मात्र नंतर सरकारने या योजनेची लोकप्रियता पाहता आणि अनेक पात्र महिला या योजनेपासून वंचित राहतील ही भीती लक्षात घेता या योजनेस 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला. एवढेच नाही तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेला आता आणखी एका महिन्याची मुदतवाढ दिली जाऊ शकते असा देखील दावा केला जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले आहेत. ऑगस्ट महिन्यात हा पैसा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
29 सप्टेंबरला या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या अंतर्गत ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले आहेत आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4,500 दिले जाणार आहेत.
मात्र ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजेच पंधराशे रुपये मिळणार आहेत.
तसेच ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे आधीच मिळाले आहेत त्यांना आता फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, ज्या महिलांनी या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात अर्ज सादर केले होते त्या महिलांना आता त्यांचा अर्ज मंजूर झाला असल्याचा मेसेज येऊ लागला आहे.
यामुळे जर तुम्हीही सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेला असेल आणि तुम्हालाही तुमचा अर्ज मंजूर झाला आहे असा मेसेज जर आलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की येत्या 40 तासात तुमच्या बँक खात्यात या योजनेचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत.
सरकारकडून अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर 29 सप्टेंबरला या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लाडकी बहीण योजना अंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
याचा लाभ राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परीत्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळणार आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळेल. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी पात्र राहील.