Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने अलीकडेच ही योजना जाहीर केली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. अर्थातच एका पात्र महिलेला एका वर्षात 18000 रुपयाचा लाभ मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे देखील देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा ऍडव्हान्स मध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आचारसंहिता लागण्याआधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. दरम्यान आता याच योजने संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
ही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडणार नाही असा पुनरुच्चार करत आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
सोबतच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. काल अर्थातच सोमवारी मुक्ताईनगर येथे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी त्यांनी विरोधक लाडकी बहीण योजनेला खोडा घालतील म्हणून आधीच आम्ही पाच हप्त्यांचे पैसे देऊ केले आहेत असेही स्पष्ट केले. एकंदरीत पुन्हा एकदा राज्यात महायुती सरकार आले तर आम्ही 1500 रुपयांना ऐवजी दोन हजार रुपये देऊ असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.