Ladki Bahin Yojana : तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज सादर केला आहे का? अहो मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. महिला वर्गाला केंद्रस्थानी ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, अन्नपूर्णा योजना अशा महत्त्वाकांक्षी योजनांची देखील सुरुवात केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात आहेत. 31 ऑगस्ट ही अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक आहे. यामुळे सध्या राज्यात या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिला वर्गाची मोठी धावपळ सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी राज्यभरातून आत्तापर्यंत एक कोटी 41 लाख 98 हजार 898 महिलांनी अर्ज सादर केले आहेत.
विशेष म्हणजे यातील एक कोटी तीस लाख अर्ज मंजूर देखील झाले आहेत. या योजनेचा राज्यातील जवळपास दोन कोटी महिलांना लाभ मिळणार असा दावा सरकारने केला आहे. अर्थातच येत्या काही दिवसांनी या योजनेच्या अर्जदारांची संख्या आणखी वाढणार आहे आणि मंजूर अर्जांची संख्याही वाढणार आहे. खरे तर या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत.
तसेच, याचा लाभ हा जुलै महिन्यापासून दिला जाणार आहे. म्हणजेच या योजनेच्या पात्र महिलांना जुलै महिन्यापासून पैसे मिळणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे महिलांना एकाच वेळी दिले जाणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 17 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यावर जमा होतील अशी माहिती नुकतीच समोर आली आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आता या योजनेसंदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी आकडेवारी समोर मांडली आहे.
या योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील 36 जिल्ह्यांमधून किती अर्ज सादर झाले आहेत, कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज आले आहेत याबाबतची आकडेवारी मंत्रिमहोदयांनी सार्वजनिक केली आहे. अशा परिस्थितीत आता आपण तुमच्या जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेसाठी किती अर्ज दाखल झाले आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
उत्तर महाराष्ट्रातून किती अर्ज दाखल झालेत?
नाशिक : 737708
अहिल्यानगर (आधीचे अहमदनगर) : 708948
नंदूरबार : 261956
धुळे : 272894
जळगाव : 533958
पश्चिम महाराष्ट्रातून किती अर्ज दाखल झालेत?
पुणे : 973063
कोल्हापूर : 696073
सांगली: 459836
सातारा : 520828
सोलापूर : 614962
मराठवाड्यातून किती अर्ज दाखल झालेत?
छत्रपती संभाजीनगर ( आधीचे औरंगाबाद ) : 541554
बीड : 352668
लातूर : 340239
नांदेड : 473087
परभणी : 25762
जालना : 300548
हिंगोली : 179145
धाराशीव ( आधीचे उस्मानाबाद ) : 179639
विदर्भातून किती अर्ज दाखल झालेत?
नागपूर : 579404
अमरावती : 400177
वर्धा : 202349
चंद्रपूर : 284967
भंडारा : 209484
गोंदीया : 288920
गडचिरोली : 156335
बुलढाणा : 387091
वाशिम : 188504
अकोला : 261895
यवतमाळ : 467674
कोकणातून किती अर्ज दाखल झालेत?
पालघर : 296051
ठाणे : 548110
रायगड : 349485
रत्नागिरी : 174324
सिंधुदुर्ग : 150478
मुंबई उपनगर : 385886
मुंबई शहर : 173191
सर्वात जास्त अन सर्वात कमी अर्ज कोणत्या जिल्ह्यातून ?
पुणे जिल्ह्यातून या योजनेसाठी आतापर्यंत नऊ लाख 73 हजार 63 महिलांनी अर्ज केले असून पुणे जिल्हा या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून सर्वात जास्त अर्ज आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सात लाख 33 हजार 708 महिलांनी यासाठी अर्ज केले असून हा जिल्हा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणजेच अहिल्या नगर जिल्हा हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून या जिल्ह्यातून सात लाख 8 हजार 948 महिलांनी अर्ज सादर केले आहेत. सर्वात कमी अर्ज कोकणातून आले आहेत. कोकणातील दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून फक्त एक लाख 478 महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा या यादीत 36 व्या क्रमांकावर आहे.