Ladki Bahin Yojana : शिंदे सरकारने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. अर्थातच एका पात्र महिलेला दरवर्षी अठरा हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र राहणार आहेत. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत.
जवळपास दीड कोटीहून अधिक पात्र महिलांना याचा लाभ मिळाला आहे. आता या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या माध्यमातून पुढील हप्त्याची वाट पाहिली जात आहे. दरम्यान आता याच संदर्भात एक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता दिला जाणार आहे.
ज्या महिलांना आधीच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत आणि ज्यांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केला आहे अशा महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत. मात्र ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले आहेत आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे 4500 दिले जाणार आहेत.
नक्कीच राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ऐन सणासुदीत महिला वर्गाला मोठा दिलासा मिळेल असे वाटत आहे. मात्र असे असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना थोडीशी धक्का देणारी ठरू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेच्या काही महिलांना याचा एकही रुपया मिळणार नाही. नक्कीच आता तुम्हाला या महिला नेमक्या कोण आहेत कोणाला याचा लाभ मिळणार नाही याविषयी जाणून घ्यायचे असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया विषय सविस्तर.
मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेच्या निधी वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. 29 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमात लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता दिला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेच्या निधी वितरणासाठी 17 ऑगस्टला पहिला मेळावा पार पडला होता.
त्यावेळी एक कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला. यानंतर 31 ऑगस्टला नागपूर येथे या योजनेचा दुसरा मेळावा पार पडला आणि त्यावेळी देखील लाखो महिलांना याचा लाभ मिळाला. पहिल्या आणि दुसऱ्या मेळाव्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे दिले गेलेत.
आता या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असून 29 सप्टेंबरला यासाठी रायगड मध्ये मेळावा आयोजित होणार आहे. तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटीनिमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत.
आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. आधी ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळाले आहे त्यांना आता फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत. मात्र ज्यांनी सप्टेंबरच्या आधीच अर्ज केले आहेत आणि अर्ज मंजूर झाले आहेत परंतु याचा पैसा मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत.
तसेच ज्यांनी सप्टेंबर मध्ये अर्ज सादर केले आहेत त्या महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. मात्र ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केले आहेत आणि ज्यांचा अर्ज अजून मंजूर झालेला नाही अशा महिलांना या महिन्यात एक रुपया सुद्धा मिळणार नाही. पुढल्या महिन्यात मात्र या महिलांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांना याचा लाभ मिळू शकतो.