Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना तीन हप्ते मिळाले आहेत. पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे मिळाले असून आता याच योजने संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका वर्षात पात्र महिलेला 18 हजार रुपये मिळणार आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यांच्या लाभासाठी पात्र ठरतील. या योजनेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्यात आले आहेत.
दरम्यान, या योजनेचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे मिळाले असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
10 ऑक्टोबरला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली आहे.
यासोबतच त्यांनी या योजनेसाठी पुढील नऊ महिन्यांच्या निधीची तरतूद करून देण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. याचाच अर्थ पुढील नऊ महिने या योजनेचे पैसे मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या उर्वरित नऊ महिन्यांसाठी 35 हजार कोटींची तरतूद केलेली आहे, त्यामुळे या योजनेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. महिलांच्या सन्मानासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
खरे तर ऑक्टोबरच्या शेवटी दिवाळीचा मोठा पर्व येणार आहे. दरम्यान याचं दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार महिलांना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देणार आहे.
भाऊबीज ओवाळणी म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील आणि हे पैसे 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यात येऊन जातील हा अजितदादांचा वादा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर सभेत म्हटले आहे. नक्कीच, दिवाळीच्या आधीच जर पात्र महिलांच्या खात्यात या योजनेचे दोन हप्ते जमा झाले तर यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.