Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे.
या योजनेच्या पात्र महिलांना आत्तापर्यंत एकूण पाच हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने पुन्हा एकदा राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे 2100 रुपये करू असे आश्वासन दिलेले आहे.
त्यामुळे आता या योजनेच्या पात्र महिलांच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत पुढील हप्ता पंधराशे रुपयांचा मिळणार की 2100 रुपयांचा, तसेच पुढील हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान आता याच योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात मोठी माहिती दिली आहे. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील हल्लाबोल केला.
आम्ही जी आश्वासनं दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी यावेळी दिले. पुढे बोलताना मुख्यमंत्री महोदयांनी आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे.
अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं म्हटलं आहे. एवढेच नाही तर प्रसारमाध्यमांमध्ये या योजनेचे निकष बदलणार अशा काही चर्चा सुरू आहेत त्यावर देखील फडणवीस यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीयेत.
आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत. डिसेंबर चा हप्ता हिवाळी अधिवेशन नंतर मिळणार असल्याचे आणि या योजनेचे निकष बदलणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असल्याने महिलांसाठी हे डबल गिफ्ट असल्याचे समजले जात आहे.