Ladki Bahin Yojana : गेल्या शिंदे सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून काही कौतुकास्पद योजना सुरू केल्यात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही देखील अशीच एक योजना. आता याच योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरेतर, डिसेंबर महिन्याच्या हप्ता कधी जमा होणार ? या चर्चा गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
या योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात मिळाला होता. मात्र या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून पैसे मिळत आहेत. आतापर्यंत या योजनेचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
म्हणजेच या योजनेच्या एका पात्र महिलेला 7500 रुपयांचा लाभ मिळाला आहे. या योजनेचे पाच हप्ते विधानसभा निवडणुकीच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. तसेच नवीन सरकार आल्यानंतर या योजनेचा पुढील हप्ता जमा होईल असे म्हटले गेले होते.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपले की लगेचच पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल असे म्हटले होते. मात्र आता हिवाळी अधिवेशन संपूर्ण तीन दिवसांचा काळ पूर्ण झाला आहे.
पण तरीही या योजनेचे पैसे अजून पर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली असून आजपासून या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे महिलांची गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आज संपणार आहे.
खरंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू अशी ग्वाही महायुतीने दिली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात महायुतीने राज्यात पुन्हा आमचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी ग्वाही दिली होती.
यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 चा मिळणार की 2100 हा सवाल होता. पण डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 2100 चा मिळणार नाही तर पंधराशे रुपयांचा मिळणार आहे. 2100 रुपयांबाबतचा निर्णय हा पुढील वर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे.