Ladki Bahin Yojana : मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज भरले होते त्यातील पात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेचे दोन महिन्यांचे पैसे देखील मिळाले आहेत.
दीड कोटीहून अधिक महिलांना या योजनेचे पहिल्या दोन महिन्याचे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे या योजनेचा तिसरा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय.
दरम्यान, आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. या योजनेचा तिसरा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे आज अर्थातच 19 सप्टेंबरला जमा होण्याची दाट शक्यता आहे. आज चार वाजल्यानंतर या योजनेचे पैसे प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात जमा होतील अशी बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
ज्या महिलांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला आहे अशा महिलांना तीन महिन्यांचे म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे म्हणजे तिन्ही हप्त्यांचे 4500 एकत्रितपणे दिले जातील अशी देखील शक्यता आहे.
अशातच या लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे जमा करण्याची शक्यता आहे.
खरे तर विधानसभा निवडणुका बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे सरकार ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांचे पैसे ऍडव्हान्स मध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे.
जर हा निर्णय घेतला तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अवघ्या काही दिवसांच्या काळातच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार रुपये मिळतील.
मात्र याबाबत अजून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु विधानसभा निवडणुका पाहता शिंदे सरकार हा निर्णय घेऊ शकते ही शक्यता नाकारून चालणार नाही.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला असल्याने विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हा मोठा निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.