Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना अर्थातच लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 च्या मुदतीपर्यंत दोन कोटी ६९ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील दोन कोटी ५८ लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. पात्र महिलांना जुलै महिन्यापासून पैसे देण्यात आले आहेत.
जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात सुद्धा माहिती हाती आली आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता असून या अनुषंगाने शासन दरबारी हालचाली वाढल्या असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे.
14 जानेवारी 2025 च्या आधीच लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता मात्र महिलांच्या खात्यात जमा होणार अशी दाट शक्यता आहे. दुसरीकडे येत्या अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम सुद्धा वाढवली जाणार अशी शक्यता आहे. सध्या लाडकी बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रति महिना या प्रमाणे लाभ दिला जात आहे.
पण अर्थसंकल्पात ही रक्कम 2100 रुपये करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आदिती तटकरे यांनी असे संकेत दिले आहेत. असे असतानाच मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार असल्याची बातमी हाती येत आहे.
या योजनेसाठी राज्यातील जवळपास अडीच कोटी महिला पात्र ठरल्या आहेत आता एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी कसे, या प्रश्नाचे उत्तर राज्य सरकार पडताळून पाहण्याच्या तयारीत आहे.
अर्जाच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याअनुषंगाने लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेरपडताळणी करण्याचे नियोजन सुरु असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. या योजनेसाठी सरकारला दीड हजार रुपयांप्रमाणे दरवर्षी ४६ हजार कोटी (दरमहा ३८७० कोटी) रुपये द्यावे लागणार आहेत.
जर प्रत्येकी २१०० रुपये द्यायचा निर्णय झाल्यास त्यासाठी सरकारला दरवर्षी ६५ हजार कोटी रुपये लागणार आहेत. तिजोरीची सद्य:स्थिती पाहता एवढा निधी उभारायचा कसा, हा मुख्य प्रश्न सरकारसमोर आहे. वित्त विभागातील अधिकाऱ्यांनीही त्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यामुळे या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांना मिळावा या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या निकषांची पडताळणी होणार आहे.
अर्ज भरताना ज्याप्रकारे अंगणवाडीसेविकांची मदत घेतली, त्याचप्रमाणे त्यांच्याच माध्यमातून अर्जांची फेरपडताळणी होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता अपात्र अर्जांची पडताळणी कशी होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता आपण लाडकी बहीण योजनेचे निकष थोडक्यात समजून घेणार आहोत.
1) लाडकी बहिण योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना मिळतो. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही.
2) ज्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात. त्यातून ट्रॅक्टर वगळण्यात आले आहे. म्हणजे ट्रॅक्टर असेल तरीसुद्धा याचा लाभ मिळू शकतो.
3) दोन हेक्टरपेक्षा (पाच एकर) अधिक शेतजमीन नसावी, दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
4) लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी, ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनांचा लाभ मिळत असेल त्या महिला यासाठी अपात्र ठरतील
5) योजनेसाठी एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा.
6) सरकारी नोकरी असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबात सरकारी नोकरदार आहेत अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.