Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची फारच चर्चा पाहायला मिळत आहे. ही योजना मध्यप्रदेश राज्यातील लाडली बहना योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. मध्यप्रदेश मध्ये सुरू असणाऱ्या या योजनेअंतर्गत तेथील पात्र महिलांना दरमहा बाराशे रुपये दिले जात आहेत.
मात्र शिंदे सरकारने राज्यात अलीकडे सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
या योजनेसाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र राहणार आहेत. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र राहणार आहे.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याच लाभ मिळणार आहे. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे.
तथापि, ज्या महिलांचा जन्म पर राज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा जुलै महिन्यापासून लाभ दिला जात आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या योजनेच्या एक कोटीहून अधिक पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत.
तसेच दोन दिवसांपूर्वी अर्थातच 29 ऑगस्टला सुद्धा या योजनेच्या अनेक पात्र महिलांना याचा लाभ मिळाला आहे. ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज भरले होते त्यांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळालेत.
आता ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरले होते त्यांना 29 ऑगस्ट पासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे दिले जात आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 31 ऑगस्ट नंतर अर्ज केला आहे अशा महिलांना देखील लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या महिलांना मिळणार साडेचार हजार रुपये
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले नाहीयेत त्यांना सप्टेंबरमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत. मात्र याचा लाभ मिळवण्यासाठी पात्र महिलांचे बँक अकाउंट आधार सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
पण या योजनेच्या अनेक पात्र महिलांच्या बँक अकाउंट ला आधार लिंक नाहीये. यामुळे पात्र असूनही या महिलांना याचा लाभ मिळालेला नाही. परंतु जेव्हा या महिला त्यांचे बँक अकाउंट आधार सोबत लिंक करतील तेव्हा त्यांना याचा लाभ मिळणार आहे.