Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत चाललं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. महायुती सरकारने राज्यातील मतदारांना खुश करण्यासाठी गेल्या काही दिवसात अनेक मोठमोठ्या योजनांची घोषणा केली आहे.
प्रामुख्याने महिला मतदारांना साधण्याचा डाव शिंदे सरकारने खेळला आहे. हेच कारण आहे की, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णासारख्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने संदर्भात आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. याची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे. म्हणजेच या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै महिन्यापासून पैसे मिळणार आहेत.
आतापर्यंत जवळपास दोन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले असून जवळपास अडीच कोटी महिला यासाठी अर्ज करतील असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे दोन कोटी महिला या योजनेसाठी पात्र होणार असा अंदाज आहे.
यामुळे ही एक गेम चेंजर योजना ठरणार आहे. हेच कारण आहे की या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करण्यासाठी आणि याचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा यासाठी शिंदे सरकार प्रयत्नशील आहे.
खरेतर, या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हे पात्र ठरणाऱ्या महिलांना रक्षाबंधनापर्यंत दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदय यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
अशातच आता काल अर्थातच शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे एका कार्यक्रमाला जात असतांना या योजनेचे पैसे राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावर कधीपासून जमा होणार ? यासंदर्भात माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या तीन दिवसांनी म्हणजेच 5 ऑगस्ट पासून या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
लाडक्या बहिणीच्या खात्यावर येत्या तीन दिवसानंतर पंधराशे रुपये टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून सर्व पात्र बहिणींना यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच रक्षाबंधनाचे गिफ्ट मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पण, या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महायुती सरकारला महिलांकडून रिटर्न गिफ्ट मिळणार का हे जाणून घेण्यासाठी निवडणुकांपर्यंत वाट पहावी लागणार आहे.