Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र ठरतील त्यांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज सादर केले होते अन ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये वर्ग झाले आहेत. आता या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय.
दरम्यान याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहिण योजनेचा पुढील हफ्ता येत्या काही दिवसात पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
मात्र हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होणार आणि तिसऱ्या हप्त्यात पात्र महिलांच्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा होणार या संदर्भात आता आपण माहिती जाणून घेणार आहोत.
किती पैसे मिळणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिलांना तिसरा हप्ता म्हणून 4,500 रुपये मिळणार आहेत. या सदर महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीनही महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत.
मात्र ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला असेल त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत. तसेच ज्यांना आधीच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत.
कधी मिळणार पैसे
17 सप्टेंबर पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होणार असल्याची खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
17 ते 19 सप्टेंबर दरम्यान या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. काही महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत आणि काही महिलांना या अंतर्गत फक्त पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.