Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या योजने संदर्भात नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. अजित पवार यांनी दिवाळीच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पुन्हा एकदा तीन हजाराची भेट मिळणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
नक्कीच दिवाळीच्या आधी पुन्हा तीन हजाराची भेट मिळाली तर लाडक्या बहिणींना दिवाळीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
ही योजना अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे. आतापर्यंत या योजनेचा पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत.
ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा महिलांना तिन्ही महिन्यांचे 4500 रुपये मिळाले आहेत आणि ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केले होते त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देण्यात आले आहेत.
दरम्यान आता या योजनेचे पुढील दोन हप्ते दिवाळीच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला.
यामुळे आता महायुतीने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांना खुश करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेसारख्या असंख्य योजना गेल्या काही दिवसांच्या काळात सुरू झाल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा सुद्धा झाले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार असून या चालू महिन्यात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की त्याच दिवशी आचारसंहिता लागू होत असते.
आता, याच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाला खुश करण्यासाठी शिंदे सरकार त्यांच्या खात्यात आणखी तीन हजार रुपये जमा करणार आहे. लाडकी बहिण योजनेचे आणखी तीन हजार रुपये आचारसंहिता लागण्याआधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथील सभेत केली आहे.
आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे, असे वक्तव्य बीडमध्ये अजित पवार यांनी केलय. यामुळे खरंच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिंदे सरकार महिलांच्या खात्यात आणखी तीन हजार रुपये जमा करणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
जर शिंदे सरकारने आचारसंहिता लागू होण्याआधीच महिलांच्या खात्यात आणखी तीन हजार रुपये जमा केलेत तर याचा असंख्य महिलांना फायदा होणार आहे आणि हा निर्णय महायुतीसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेमचेंजर ठरण्याची शक्यता देखील आहे.