Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा पुढील सहावा हप्ता 15 डिसेंबर नंतर पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्या आधीच मात्र लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून हजारो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील दहा हजार अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच या महिलांना लाडकी बहिण योजनेचा एकही रुपया आता मिळणार नाही. या महिलांना लाडकी बहिणचा लाभ दिला जाणार नाही.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत स्थगित करण्यात आली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील अर्जांची देखील जोरदार छाननी सुरू असून यातूनच एक धक्कादायक बातमी समोर आली अशी. निकषात न बसणारे जिल्ह्यातील अर्ज बाद केले जात आहेत. त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
खरे तर राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री महोदयांनी या योजनेची पुन्हा उलटतपासणी करून निकष आणखी कठोर करण्याचे संकेत दिले होते.
यानुसार या योजनेसाठी दाखल झालेल्या अर्जांची कसून तपासणी होत असून याच तपासणी अंतिम जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक महिला यासाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील 20 लाख 84 हजार अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची महिला बालकल्याण विभागाची माहिती समोर आली आहे.
या योजनेसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत जिल्ह्यातून 21 लाख 11 हजार 363 मंजूर करण्यात आले होते. बाकी अर्जाची छाननी बाकी होती. अजूनही 12 हजार अर्जाची छाननी बाकी आहे.
जिल्ह्यातून सादर झालेल्या अर्जांपैकी आत्तापर्यंत 9 हजार 814 अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत तर 5 हजार 814 अर्जमध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. पुणे शहरात 6 लाख 82 हजार 55 आले. त्यातील 6 लाख 67 हजार 40 अर्ज मंजूर झाले. तर 3 हजार 494 अर्ज अपात्र ठरले आहेत.