Ladki Bahin Yojana Aadhar Card : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. या योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. विशेष म्हणजे घोषणेनंतर अवघ्या काही तासांनी या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजे एका वर्षात पात्र ठरणाऱ्या महिलांना 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम ही थेट डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही योजना मध्य प्रदेश राज्यात सुरू असलेल्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे.
जेव्हापासून ही योजना जाहीर झाली आहे तेव्हापासूनच या योजनेच्या मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. महिला वर्ग सध्या या योजनेसाठी अर्ज भरणे हेतू मोठी गर्दी करत आहेत. अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2024 आहे.
ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ दिला जाणार आहे. या अंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आणि ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहन नसणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे.
परराज्यात जन्म झालेल्या मात्र महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलेल्या महिला देखील या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. खरंतर, ही योजना राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे.
सुरवातीला या योजनेसाठी अनेक निकष लावण्यात आले होते. आता मात्र या योजनेच्या अनेक निकषांमध्ये शिथिलता आली आहे. कागदपत्रांमध्ये देखील सरकारने मोठी सवलत दिलेली आहे. अशातच आता महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून या योजनेबाबत एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करणे हेतू सरकारने नारी शक्तीदूत अॅप विकसित केले आहे. मात्र या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज सादर करताना महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अर्ज करताना महिलांकडून छोटीशी चूक झाली तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या अँपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधारकार्डवर जे नाव लिहिले आहे तेच नाव अर्जात लिहावे लागणार आहे. आधारकार्डवर जी जन्म तारीख आहे तीच जन्मतारीख अर्ज भरताना नोंदवावी लागणार आहे. आधारकार्डवर जन्मदिनांक नसल्यास जन्म दाखल्यावरून जन्मदिनांक घेतली पाहिजे असे सरकारने स्पष्ट केले आहे.
अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि अन्य माहिती देखील आधार कार्ड नुसारच हवी. आधारकार्डवरील नावाप्रमाणे बँकेच्या खात्यावरही तेच नाव असायला हवे. आधार क्रमांक बँकेशी संलग्न असल्याची खात्री करून तशी माहिती यात भरावी, अशी सूचना यावेळी सरकारने जारी केली आहे.