Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. जुलै 2024 पासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ दिला जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ मिळतो. या योजनेसाठी राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिला पात्र ठरल्या आहेत अन ही सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी योजना म्हणून ओळखली जात आहे.
या योजनेला राज्यातील महिलांकडून भरघोस असा प्रतिसाद मिळत असून याच योजनेच्या जोरावर महायुती सरकारने राज्यात पुन्हा सरकार स्थापित केले आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे 9 हजार रुपये देण्यात आले आहेत.
महत्त्वाची बाब अशी की या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा 14 जानेवारीच्या आधी अर्थातच मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार असल्याची खात्रीलायक बातमी देखील विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
नक्कीच मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींना या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला तर त्यांच्यासाठी ही एक मोठी दिलासा देणारी बातमी राहील. यामुळे लाडक्या बहिणींचा मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होईल.
पण या साऱ्या घडामोडींमध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी होणार असल्याची बातमी देखील समोर येत आहे. लाडक्या बहिणीच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी होईल आणि या योजनेतून जवळपास 60 लाख महिला बाद होतील असा दावा केला जातोय.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि बालविकास विभागाने लाडकी बहिण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जेणेकरुन योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणा-या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल.
त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोझा कमी होईल. या प्रक्रियेमुळे राज्यातील 2. 46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25 टक्के लाभार्थी म्हणजे जवळपास 60 लाख लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
त्यामुळे सरकारची दरमहा 900 कोटी रुपयांची बचत होईल असे सुद्धा सांगितले जात आहे. आयकर भरणाऱ्यांव्यतिरिक्त, सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळणार आहे.
नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी योजना देखील लाडकी बहीणच्या यादीशी जोडल्या जाणार असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर विभागाने वाहतूक विभागाकडून देखील एक डेटा मागवला आहे. यामुळे ज्या महिलांच्या घरात चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) त्या महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहे. एकंदरीत, आगामी काळात या योजनेसाठी पात्र ठरलेल्या अनेक लाडक्या बहिणी नावडत्या होणार आहेत.