Ladki Bahin Yojana : तुम्हीही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे का ? मग तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काल अर्थातच 14 ऑगस्ट ला राज्यातील काही महिलांच्या बँक अकाउंट मध्ये लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई आणि सिंधुदुर्ग मधील अनेक महिलांच्या खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये काही पात्र महिलांना याचा लाभ देण्यात आला आहे. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केले होते त्या महिलांना लाभ मिळाला आहे.
विशेष म्हणजे 17 ऑगस्ट पर्यंत अर्थातच रक्षाबंधनाच्या आधीच आतापर्यंत मंजूर झालेल्या अर्जदार महिलांना या योजनेचा पैसा मिळणार आहे. एकाच वेळी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले असल्याने महिला वर्गात मोठे आनंदाचे वातावरण आहे.
सर्वत्र सरकारच्या या योजनेचे कौतुक केले जात आहे. ज्या महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले आहेत त्या महिलांकडून काही ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की याआधी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून ट्रायल म्हणून काही निवडक महिलांच्या बँक अकाउंट मध्ये एक रुपया जमा करण्यात आला होता.
या योजनेअंतर्गत थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली अंतर्गत पैसे जमा केले जाणार असल्याने सरकारने ही प्रणाली व्यवस्थित काम करत आहे की नाही? हे चेक करण्यासाठी आधी एक रुपया टाकला होता.
आता याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही निवडक महिलांच्या बँक अकाउंट मध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. दरम्यान ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना 17 ऑगस्टला दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत.
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी 35 लाख महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. मात्र 17 ऑगस्टला फक्त एक कोटी दोन लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कारण की 27 लाख महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न केलेले नाहीये.
यामुळे ज्या महिलांचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत संलग्न नसेल त्यांना याचा लाभ देता येणार नाहीये. परंतु हे काम आता युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
शासनाकडून मंजूर झालेल्या ज्या अर्जदार महिलांनी आपल्या बँक अकाउंट आधार सोबत संलग्न केलेले नाहीये अशा महिलांचे बँक अकाउंट आधार सोबत संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यामुळे 17 ऑगस्टला एक कोटी दोन लाख महिलांच्या बँक अकाउंट मध्ये तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर दहा दिवसांनी उर्वरित महिलांच्या बँक अकाउंट मध्ये देखील दोन्ही महिन्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत.तसेच सरकारने 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज सादर करण्याची मुदत अंतिम नसून त्यापुढेही या योजनेसाठी अर्ज करता येणार अशी मोठी माहिती दिली आहे.