Konkan Railway News : यावर्षी 19 सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांना प्रवास करताना कसलीही अडचण येऊ नये यासाठी कोकण रेल्वे कडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका विशेष मेमू ट्रेनला नवीन थांबा देण्यात आला आहे.
यामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गणेशोत्सवाच्या काळात मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त होत आहे. कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे स्थित असलेल्या दिवा जंक्शन वरून धावणाऱ्या दिवा ते रत्नागिरी मेमू ट्रेनला अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवा ते रत्नागिरी मेमू ट्रेन आता सापे वामने या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. दिवा-रत्नागिरी मेमु ट्रेनला सापे वामने या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याने या परिसरातील रेल्वे प्रवाशांना गणेशोत्सवामध्ये याचा फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर मोठी गर्दी होते. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या एक्सप्रेस ट्रेनला अतिरिक्त थांबा देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
दिवा जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान धावणारी 01153 ही मेमू ट्रेन आता सापे वामने या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. याशिवाय रत्नागिरी ते दिवा दरम्यान धावणाऱ्या 01154 या मेमूत्ला देखील सापे वामने या रेल्वेस्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
याशिवाय मंगळुरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दरम्यान धावणाऱ्या 12620 मत्स्यगंधा एक्सप्रेस ट्रेनला थ्री एसी टायरचा एक अतिरिक्त डबा जोडण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील रेल्वेने घेतला आहे. यामुळे या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे रिझर्वेशन करताना ज्या प्रवाशांना वेटिंग लिस्ट मध्ये ठेवण्यात आले आहे त्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.