Konkan Railway News : आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. रेल्वेची सेवा विविध मार्गांवर सुरू आहे. रेल्वे विभाग प्रवाशांसाठी अनेक एक्सप्रेस गाड्या चालवत आहे. मात्र या गाड्या सुरू असल्या तरी देखील अनेकदा रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होत असते आणि तेव्हा प्रवाशांना मोठा अडचणींचा सामना करावा लागतो.
ही अशी परिस्थिती ज्यावेळी सणासुदीचे दिवस असतात आणि उन्हाळीच्या सुट्ट्या असतात तेव्हा अधिक पाहायला मिळते. हेच कारण आहे की उन्हाळी सुट्टी मध्ये रेल्वेच्या माध्यमातून विशेष म्हणजेच अतिरिक्त गाड्या चालवल्या जातात.
दरम्यान या अशाच अतिरिक्त गाड्यांपैकी एक असणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावत असून या निर्णयाचा कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेने उधना जंक्शन ते मंगळुरू यादरम्यान धावणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
खरे तर, पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही गाडी जून अखेरपर्यंत चालवली जाणार होती. मात्र आता ही गाडी ऑक्टोबर अखेरपर्यंत चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला असून याबाबतची अधिसूचना देखील निघाली आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे आहे आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेते या संदर्भात माहिती जाणून घेऊयात.
कस आहे वेळापत्रक ?
उदना जंक्शन ते मंगळुरू द्वि साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन दर बुधवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता उदना जंक्शन येथून निघते आणि ही गाडी मंगळूर जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 19:45 वाजता पोहचते.
तसेच परतीच्या प्रवासात अर्थातच गुरुवारी आणि सोमवारी रात्री 22:10 वाजता विशेष एक्सप्रेस ट्रेन मंगळुरू जंक्शन येथून निघते आणि दुसऱ्या दिवशी 23:05 वाजता ती गाडी उधना जंक्शनला पोहोचते.
कोकणातील कोणत्या स्थानकावर थांबा घेते
ही गाडी कोकणातील 16 रेल्वे स्थानकावर थांबते. पालघर, वसई रोड, पनवेल रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकावर या गाडीला थांबा मिळाला आहे.