Kolhapur Vande Bharat Express : सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेसची धूम आहे. अल्पावधीतच ही गाडी प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. हेच कारण आहे की आता वेगवेगळ्या रूटवर ही गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांच्या माध्यमातून होत आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील आपल्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता कोल्हापूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन देण्यात आले आहे. खरं पाहता कोल्हापूर ते मुंबई दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र या दोन शहरादरम्यान प्रवासासाठी असणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेस ला कायमच गर्दी असते. शिवाय या गाडीने प्रवास केला तर प्रवासासाठी तब्बल 11 तासांचा कालावधी लागतो. याउलट मग बाय रोड प्रवास केला तर प्रवासी सात तासात मुंबई गाठू शकतात.
यामुळे या रूटवर सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत अरिहंत जैन फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ओशोवाल यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. जयेश ओशोवाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, मुंबई ते कोल्हापूर दरम्यान दुरांतो एक्सप्रेस किंवा वंदे भारत एक्सप्रेस यांसारखी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू केली गेली पाहिजे.
यासोबतच त्यांनी बंद झालेले कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासह इतरही अनेक मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता कोल्हापूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांची देखील आहे. मात्र याबाबत लोकप्रतिनिधींकडून पाहिजे तसा पाठपुरावा होत नसल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.
हे पण वाचा :- सातवी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी निघाली जाहिरात, पगार मिळणार तब्बल 60 हजार, आजच करा अर्ज
दरम्यान आता ज्योतिरादित्य सिंधिया याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करतात का? त्याला भारतीय बोर्ड परमिशन देतं का? मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होते का हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पण जर यार रूटवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर कोल्हापूर ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. मुंबईहून कोल्हापुरासाठी येणाऱ्या आणि कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
दरम्यान रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. ही एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्यासाठी दिल्ली मुख्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून मुख्यालयाकडून परमिशन मिळताच या रूटवर ही ट्रेन सुरू होईल असा दावा यावेळी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ लोकांचे रेशन कार्ड झाले बंद; तहसीलला रेशन कार्ड जमा करण्याचे आवाहन; यादीत तुम्हीही आहात का?