Kolhapur Railway News : भारतीय रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलण्याची कुवत ठेवणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा रंगत आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राला आतापर्यंत चार वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. यामध्ये नुकत्याच सामील झालेल्या मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेनचा देखील समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेस ची भेट दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई ते गोवा आणि पुणे ते सिकंदराबाद या रूटवर ही ट्रेन धावेल असं रेल्वेच्या माध्यमातून सांगितले जात आहे. मुंबई गोवा संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच माहिती दिली आहे. यामुळे या रूटवर लवकरच ही ट्रेन धावणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांना लवकरच मिळणार मोठ गिफ्ट! ‘या’ मार्गांवर तयार होणार सर्वाधिक लांबीचा डबल डेकर रस्ता, ट्रॅफिकची कायमची कटकट मिटणार
निश्चितच या ट्रेनमुळे राज्यातील रेल्वे प्रवासाला गती लाभत आहे. परंतु कोल्हापूर ते मुंबई दरम्यान प्रवास करण्यासाठी फक्त दोनच रेल्वे आहेत. आतापर्यंत या रूटवर महालक्ष्मी, सह्याद्री आणि कोयना अशा तीन एक्सप्रेस धावत होत्या. पण यापैकी सह्याद्री प्रवासी कमी असल्याचे कारण पुढे करत कोरोना पासून बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरहून राजधानी मध्ये कामानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरवर्ग, उद्योजक इत्यादींची हेळसांड होत आहे.
प्रायव्हेट वाहनांनी या लोकांना प्रवास करावा लागत आहे. रस्ते मार्गाने कोल्हापूरहून मुंबईचा प्रवास अधिक वेळखाऊ होत असल्याने आता याही मार्गावर वंदे भारत ट्रेन धावावी अशी प्रवाशांची मागणी आहे. कोल्हापूर मधून संसदेत तीन खासदार आहेत परंतु तीन खासदार असूनही कोल्हापूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत सुरु होत नाही.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 50,000 प्रोत्साहन अनुदानाची चौथी अन अंतिम यादी जाहीर; ‘या’ पद्धतीने चेक करा यादीत आपलं नाव
किंबहुना यासाठी प्रखड मागणी होत नसल्याने लोकप्रतिनिधींचा काय उपयोग असा संतप्त सवाल कोल्हापूरच्या नागरिकांकडून यावेळी उपस्थित केला जात आहे. या ठिकाणी विशेष बाब अशी की पुणे आणि सोलापूर यांना आणखी एक वंदे भारत ट्रेन चा फायदा होणार आहे. पुणे सिकंदराबाद ही वंदे भारत ट्रेन्स सोलापूर मार्गे धावणार असल्याने या ट्रेनचा पुणे आणि सोलापूर वासियांना मोठा फायदा हा होणारच आहे.
यामुळे ज्या भागातील राज्यकर्ते स्ट्रॉंग आहेत त्या ठिकाणी वंदे भारतची भेट मिळत आहे आणि ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा होत नाही त्या ठिकाणी वंदे भारत तर सोडा पण नियमित रेल्वे देखील सुरू राहत नसल्याचा प्रवाशांकडून आरोप केला जात आहे. वास्तविक कोल्हापूरला वसलेल्या आई अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! राज्यातील सर्व महिलांना अर्ध्या तिकिटावर एसटीचा प्रवासाची योजना; ‘या’ महिन्यापासून होणार लागू, पहा डिटेल्स
विशेष म्हणजे राजधानी मुंबईहून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल होतात. या परिस्थितीत मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस च्या धरतीवर कोल्हापुरसाठी देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जावी अशी प्रवाशांची मागणी आहे. शिवाय कोल्हापूरहून रोजाना 2 हजाराहून अधिक प्रवाशांचे राजधानी मुंबईसाठी आरक्षण सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वेसाठी असते.
अशा परिस्थितीत जर कोल्हापूर ते मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना फायदा होईल, अध्यात्मिक पर्यटन वाढेल, तसेच कोल्हापूरहून मुंबई दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना देखील याचा फायदा होईल, तसेच कामानिमित्त मुंबईमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी, उद्योजक, नोकरदार यांना देखील या ट्रेनचा फायदा होऊ शकतो. निश्चितच प्रवाशांच्या या मागणीकडे लोकप्रतिनिधींकडून काही पाठपुरावा होतो का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा :- आता टाटा तयार करणार वंदे भारत ट्रेन ! येत्या 2 वर्षात धावणार तब्बल 200 वंदे भारत एक्सप्रेस, पहा रेल्वेच नियोजन