Kolhapur Mumbai Railway Train News : राजधानी मुंबई ते कोल्हापूर या दोन शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. कोल्हापूरहून विद्यार्थी, उद्योजक, पर्यटक मुंबईकडे रेल्वे मार्गे प्रवास करतात. तर मुंबईहून देखील कोल्हापूरच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापूरात दाखल होतात. मात्र कोरोना काळापासून मुंबईहून कोल्हापूर आणि कोल्हापूर मुंबई हा प्रवास म्हणजे तारेवरची कसरत बनला आहे.
कारण की या दोन शहरांना कनेक्ट करणारी महत्त्वाची सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आली आहे. मुंबई-पुणे-कोल्हापूर या मार्गे धावणारी ही एक्सप्रेस बंद झाल्याने या तिन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. वास्तविक कोरोना काळात लॉकडाउनमुळे रेल्वे प्रशासनाकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये अनेक एक्सप्रेस गाड्या बंद करण्याचा निर्णयाचा देखील समावेश होता. या मध्ये मुंबईहुन पुणेमार्गे कोल्हापूरला धावणारी सह्याद्री एक्सप्रेस देखील बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र आता कोरोना काळात घेतलेल्या या निर्णयाला बदलण्याची गरज असून या मार्गावर ही एक्सप्रेस सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी प्रवाशांकडून वारंवार रेल्वे बोर्डाकडे तसेच शासनाकडे मागणी केली जात आहे. मात्र प्रवाशांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नाही. अशातच आता ही गाडी सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. म्हणून आता ही एक्सप्रेस लवकरच सुरू होऊ शकते असा आशावाद व्यक्त होत आहे. असं झाल्यास निश्चितच प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
ही गाडी सुरू झाल्यास केवळ मुंबई ते कोल्हापूरचा प्रवास वेगवान होईल असे नाही तर या सह्याद्री एक्सप्रेस चा फायदा पुणेकरांना देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. अशा परिस्थितीत या सह्याद्री एक्सप्रेस चा फायदा कोणीकरांना देखील होणार आहे. वास्तविक पुणेकरांना मुंबईकडील प्रवास करण्यासाठी डेक्कन क्वीन वंदे भारत एक्सप्रेस सह इतरही गाड्या उपलब्ध आहेत.
मात्र कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करण्यासाठी या सह्याद्री एक्सप्रेस चा पुणेकरांना विशेष फायदा होणार आहे. शिवाय राजधानी मुंबईकडील प्रवास करण्यासाठी गाड्यांच्या संख्येत भर पडणार आहे. यामुळे जर डेक्कन आणि वंदे भारत पकडता आली नाही तर सह्याद्रीने प्रवास करता येणे प्रवाशांना शक्य होईल.