Kokan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय.
मध्य रेल्वे सावंतवाडी ते पनवेल यादरम्यान ही गाडी चालवणार आहे. ही स्पेशल ट्रेन १२ नोव्हेंबरला धावणार आहे आणि परतीच्या प्रवासात ही गाडी १३ नोव्हेंबरला चालवली जाणार अशी माहिती हाती आली आहे.
यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांचे अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी या गाडीमुळे सामावून घेतली जाईल आणि यामुळे नक्कीच गर्दीच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
दरम्यान आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानावर थांबा घेणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या विशेष गाडीचे वेळापत्रक कसे आहे?
सावंतवाडी-पनवेल साप्ताहिक स्पेशल ट्रेन सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. ही गाडी परतीच्या प्रवासात पनवेल येथून सकाळी ९.४० वाजता सोडली जाणार आहे अन त्याच रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी सावंतवाडी येथे पोहोचणार आहे.
ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार
मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर चालवली जाणारी ही विशेष २० एलएचबी डब्यांची ट्रेन कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, रोहा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.