Kisan Credit Card Rule 2025 : 2025 च्या अगदी सुरुवातीलाच देशातील शेतकऱ्यांना एक मोठी भेट मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून किसान क्रेडिट कार्ड च्या नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेत आता वाढ होईल असा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. सध्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत तीन लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. मात्र येत्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा दोन लाखांनी वाढवली जाणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आता पाच लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते आणि याबाबतचा निर्णय अर्थसंकल्पात होईल असे म्हटले जात आहे. नक्कीच असे झाल्यास देशभरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
खरं तर किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम वाढवली गेली पाहिजे अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जात आहे. आता याच मागणीच्या अनुषंगाने फेब्रुवारी 2025 ला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय होईल असा दावा मिळाला रिपोर्टमध्ये होतोय.
मंडळी किसान क्रेडिट कार्ड योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना 26 वर्षांपूर्वी 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत शेती व संबंधित कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजाने अल्पमुदतीचे कर्ज दिले जात आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाखांचे कर्ज मिळते.
हे कर्ज शेतकऱ्यांना नऊ टक्के व्याजदराने दिले जाते मात्र या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावरील व्याजावर 2 टक्के सूटही देते. त्याचवेळी, जे शेतकरी संपूर्ण कर्जाची वेळेवर परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून आणखी 3 टक्के सवलत दिली जाते.
म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत जे बांधव अल्पमुदतीचे कर्ज घेतात अन या अल्पमुदतीच्या कर्जाची वेळेवर परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. जून 2023 अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत 7.4 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असल्याची आकडेवारी समोर आली आहे.