Kisan Credit Card News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी सहजतेने भांडवल उपलब्ध व्हावी यासाठी केंद्रातील सरकारने किसान क्रेडिट कार्ड नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उभं करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत नाही. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज फक्त चार टक्के व्याज दराने उपलब्ध होते. आतापर्यंत किसान क्रेडिट कार्ड योजनेत लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
महाराष्ट्रातीलही असंख्य शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. कमी कालावधीतच या योजनेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान जर तुमच्याकडे ही किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण किसान क्रेडिट कार्ड मधील बॅलन्स कसा तपासायचा याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर किसान क्रेडिट कार्ड धारकांना हे कार्ड वापरण्यात आणि त्याचा बॅलन्स तपासण्यात अडचणी येतात.
यामुळे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड मधील बॅलन्स कसा चेक करायचा याची विचारणा करत होते. देशभरातील अनेक शेतकरी एसबीआयचे किसान क्रेडिट कार्ड वापरतात. एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे.
या बँकेत देशभरातील लाखो शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत. यातील बहुतांशी शेतकरी किसान क्रेडिट कार्ड वापरतात. म्हणून आता आपण एसबीआयचे किसान क्रेडिट कार्ड मधील बॅलन्स कसे चेक करायचे हे पाहणार आहोत.
एसबीआय किसान क्रेडिट कार्ड मधील बॅलन्स कसे चेक करणार?
SBI किसान क्रेडिट कार्डची शिल्लक तपासण्यासाठी SBI ने दोन टोल फ्री क्रमांक जारी केलेले आहेत. या टोल फ्री क्रमांकांवर कॉल करून तुम्ही यातील शिल्लक रकमेची माहिती मिळवू शकता. 1800 11 2211 / 1800 425 3800 या नंबरवर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड मधील शिल्ल्लक रकमेची माहिती मिळणार आहे.
तुम्ही SBI च्या या नंबरवर कॉल करू शकता पण, या क्रमांकावर कॉल करण्यासाठी ठराविक शुल्क सुद्धा आकारले जाते. आरबीआयने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आरबीआयने को-लॅटरल फ्री कर्जाची रक्कम दोन लाखांपर्यंत वाढवली आहे. आधी ही रक्कम एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत होती. म्हणजेच दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता शेतकऱ्यांना विनाहमी मिळणार आहे.