Kisan Credit Card : शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी भांडवल लागतं. मात्र, शेतीतून मिळणार उत्पन्न हे पोटाची खळगी भरण्यातचं निघून जात. अशा परिस्थितीत शेतीसाठी भांडवलाचा प्रश्न ऐरणीवर येतो. मग अनेकदा शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतात आणि कर्जाच्या ओझ्याखाली आयुष्यभर दाबले जातात.
अनेकदा सावकारी कर्जाचे ओझे इतकं वाढतं की या विवचनेतून शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात. महाराष्ट्रात तर दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून काही योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
किसान क्रेडिट कार्ड ही देखील अशीच एक योजना आहे. शेती करताना पैशांची उपलब्धता व्हावी या अनुषंगाने शासनाकडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्जाचा पुरवठा केला जात आहे. यामुळे आज आपण किसान क्रेडिट कार्ड साठी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने अर्ज केला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज डाऊनलोड करणे हेतू सर्वप्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर जायच आहे. या वेबसाईच्या उजव्या कोपऱ्यात Download KCC Form पर्यायावर क्लिक करायच आहे. यानंतर क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज ओपन होईल. जो की व्यवस्थित रित्या भरावा लागणार आहे.
अर्जाच्या सुरवातीला to branch manager या ठिकाणी बँकेचे नाव आणि शाखेचे नाव प्रविष्ट करायच आहे.
A For Office Use याखाली दिलेल्या रकान्यात कोणतीच माहिती भरायची नाही.
B या ठिकाणी issue of fresh KCC म्हणजे नवीन केसीसी कार्ड काढायचं की enhancement of KCC limit म्हणजे कर्ज रकमेत वाढ करायची की activation of inoperative KCC account म्हणजे बंद पडलेलं केसीसी पुन्हा सुरू करायचं यापैकी तुम्हाला आवश्यक तो पर्याय निवडायचा आहे. यानंतर त्याच्या खाली amount of loan required या ठिकाणी तुम्हाला किती कर्ज लागणार आहे ते लिहायचं आहे.
C या ठिकाणी ; Name of the applicant : म्हणजेच अर्जदार शेतकऱ्याचे नाव टाकायच आहे.
Account number pm Kisan beneficiary : म्हणजेच ज्या अकाउंट मध्ये पीएम किसानचे पैसे वर्ग होतात तो अकाउंट नंबर टाकायचा.
If not covered Pradhanmantri Suraksha Bima Yojana and Pradhanmantri Jivan Jyoti Bima Yojana consent for auto debit coverage under this to schemes :- म्हणजेच जर तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना याचा इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्या समोरील YES या पर्यायावर टिक करायच आहे. पण जर तुम्ही एस म्हटलं तर प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेचे 12 रुपये आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेचे 330 रुपये असे 342 रुपये दरवर्षी तुमच्या खात्यातून ऑटोमॅटिक कट होणार आहेत. या इन्शुरन्स स्कीम मध्ये मात्र दोन लाखाचा विमा लाभ तुम्हाला मिळणार आहे.
D details of existing loans :- या ठिकाणी तुम्ही आधी घेतलेल्या कर्जाचा सर्व तपशील द्यायचा आहे. त्यामध्ये आपण कर्ज कुठून घेतल आहे, बँकेचे नाव काय, कर्जाची रक्कम किती बाकी आहे थकबाकी आहे का याची माहिती द्यायची आहे.
E Particulars of total land Holdings of the applicants and crops :- यात गावाचं नाव, सर्वे किंवा गट क्रमांक, जमीन स्वत:च्या मालकीची आहे की भाडेतत्वानं करत आहात की सामायिक मालकीची आहे, तो पर्याय टिक करायचा आहे. पुढे तुमच्याकडे किती एकर शेतजमीन आहे आणि खरीप, रबी आणि इतर कोणती पीकं घेतली जातात, त्याबद्दल माहिती भरायची आहे.
F KCC to fisheries and animal husbandry :- मत्स्य पालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा रकाना आहे. यामध्ये तुमच्याकडे किती जनावरे आहेत त्यांचा तपशील द्यायचा आहे.
G security proposed to be offered :- यामध्ये सेक्युरिटी म्हणून तुम्ही काय मालमत्ता देणार आहात याचा तपशील भरायचा आहे. यानंतर सही करायची आहे.
त्यानंतर दिलेला भाग हा बँकेच्या कामासाठी असतो. या ठिकाणी शेतकरी बांधवांनी काहीच भरायचे नाही.
अर्ज भरल्यानंतर शेतकरी बांधवांनी संबंधित अर्जाची प्रिंट आऊट घेऊन आवश्यक ती कागदपत्रे बँकेत जमा करायचीं आहेत.
खरं पाहता वर दिलेला फॉर्म हा पी एम किसान च्या लाभार्थ्यांसाठी आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी नसाल तर एखाद्या बँकेकडून हा फॉर्म पीएम किसानचे लाभार्थी नाही म्हणून स्वीकारला जाणार नाही. परंतु किसान क्रेडिट कार्ड सर्वांना लागू आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला दुसरा फॉर्म दिला जाईल तो तुम्ही योग्य पद्धतीने भरू शकता आणि आवश्यक ती कागदपत्रे जमा करू शकता.
शेतकरी मित्रांनो, हा तर झाला ऑफलाईन फॉर्म भरण्याचा प्रकार, ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आपले सेवा केंद्रलाच भेट द्यावी लागणार आहे. शेतकरी प्रत्यक्ष हा फॉर्म भरू शकत नाही. आपले सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरवर यासाठी तुमच्याकडून ठराविक शुल्क घेतला जाऊ शकतो.