Kharif Season Soybean Farming : मे महिना संपण्यासाठी मात्र एका आठवड्याचा कालावधी बाकी राहिला आहे. अर्थातच आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाला सुरवात होणार आहे. यंदा राज्यात मात्र मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचा अंदाज नुकताच हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा केरळमध्ये तीन दिवस उशिरा मान्सूनच्या आठ म्हणून होणार आहे. सामान्यता केरळमध्ये मान्सून एक जूनला येतो मात्र यंदा 4 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल.
यानंतर मग मान्सूनचे आगमन आपल्या महाराष्ट्रात म्हणजेच तळ कोकणात होईल त्यानंतर मुंबईमध्ये आणि मग मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल.
मान्सूनचे आगमन झाले की शेतकरी बांधव पीक पेरणीसाठी पुढे सरसावणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणजेच सोयाबीनच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
विशेष म्हणजे आज आपण ज्या जातींची माहिती जाणून घेणार आहोत त्या सर्व जाती महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आलेल्या आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारच्या ‘या’ एका निर्णयामुळे उन्हाळी कांदा दरात होणार मोठी वाढ, वाचा….
महाराष्ट्रासाठी शिफारशीत केलेल्या सोयाबीनच्या जाती खालील प्रमाणे (Soybean Variety For Maharashtra Farmer)
पीडीकेव्ही अंबा (एएमएस-100-39) :- हे अलीकडेच विकसित करण्यात आलेल एक सुधारित सोयाबीन वाण आहे. हे वाण सन 2021 मध्ये प्रसारित करण्यात आले आहे. ही जात 42 ते 44 दिवसात 50% फुलोऱ्यावर येण्यास सक्षम असते. तसेच जवळपास 94 ते 98 दिवसात या जातीपासून उत्पादन मिळते. हेक्टरी 29 ते 30 क्विंटल उत्पादन या जातीपासून मिळवता येणे शेतकऱ्यांना शक्य आहे.
सुवर्णं सोया (एएमएस-एमबी-5-18) :- ही महाराष्ट्रासाठी शिफारशीत केलेली सोयाबीनची एक प्रमुख जात आहे. या जातीची पेरणी राज्यात मोठ्या प्रमाणात केली जात असून 2019 मध्ये ही जात प्रसारित करण्यात आली आहे. म्हणजेच ही देखील अलीकडेच विकसित झालेली सोयाबीन जात आहे. या जातीची पेरणी केल्यानंतर पीक 41 ते 45 दिवसात 50 टक्के फुलोऱ्यावर येते. साधारणतः शंभर ते 102 दिवसात या जातीपासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळते. उत्पादनात ही जात मात्र पीडीकेव्ही अंबा (एएमएस-100-39) या जातीपेक्षा कमी आहे या जातीपासून 24 ते 28 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
हे पण वाचा :- नोकरीने मारले पण काळ्या आईने तारले ! शेवगा शेतीतून तरुण शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई, वाचा ही यशोगाथा
पीडीकेव्ही येलो गोल्ड (एएमएस-1001) :- ही जात 2018 मध्ये प्रसारित करण्यात आलेली एक सुधारित जात आहे. या जातीची पेरणी केल्यानंतर साधारणतः 40 ते 44 दिवसात 50 टक्के पीक फुलोऱ्यावर येते. पेरणीनंतर साधारणता 95 ते 100 दिवसात या जातीपासून हेक्टरी 22 ते 26 क्विंटल उत्पादन मिळते. निश्चितच वर नमूद केलेल्या दोन्ही जातीच्या तुलनेत ही जात उत्पादनासाठी कमी आहे.
पीडीकेव्ही पूर्वा (एएमएस-2014-1) :- महाराष्ट्रासाठी ही देखील जात शिफारशीत करण्यात आली आहे. ही जात 2020 मध्ये प्रसारित झाली असून पेरणीनंतर 102 ते 105 दिवसात या जातीपासून उत्पादन मिळते. साधारणता 22 ते 26 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देण्यात ही जात सक्षम आहे.
जेएस 20-116 :- हे सोयाबीन वाण 2019 मध्ये प्रसारित करण्यात आले आहे. या जातीची लागवड केल्यानंतर पीक 95 ते 100 दिवसात उत्पादन देण्यास तयार होते. या जातीपासून 26 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ एका चुकीमुळे महाराष्ट्रातील 32 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही नमो शेतकरीचा पहिला हप्ता, वाचा सविस्तर