Kapus Bajarbhav : मित्रांनो यावर्षी कापूस लागवडी खालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जाणकार लोकांच्या मते, गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकरी बांधवांना यावर्षी देखील कापसाला गेल्या वर्षी प्रमाणेच विक्रमी बाजारभाव मिळेल अशी आशा होती. विशेष म्हणजे यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची ही आशा सत्यात उतरणार असे चित्र देखील उपस्थित झाले होते.
मित्रांनो यावर्षी कापूस हंगाम विजयादशमीच्या दिवशी सुरू झाला. त्यावेळी कापसाला तब्बल 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला होता. काही मीडिया रिपोर्ट मध्ये खानदेशात उडताच्या कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असल्याचा दावा झाला होता. मात्र तदनंतर कापूस बाजार भाव दबावात आले. कापसाचे बाजार भाव साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल वर स्थिरावले.
दरम्यान आता पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी दिला साधा एक बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्या तीन दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होत आहे. सोयापेंडच्या तसेच इतर तेलबिया पेंडच्या दरात वाढ झाली असल्याने याचा आधार कापूस बाजाराला मिळत आहे. तेलबिया पेंडच्या दरात वाढ होत असल्याने सरकी पेंड ची मागणी वाढली आहे. परिणामी बाजारात सरकीचे दर वाढले आहेत. सरकीचे दर वाढले असल्याने तसेच मागणी देखील वाढली असल्याने कापसाची मागणी आणि बाजारभावात वाढ होत आहे.
याशिवाय जाणकार लोकांनी आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजार भावात वाढ होत आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात देखील कापसाचे दर वाढत असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो आता कापसाच्या बाजारभावात क्विंटल मागे पाचशे रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजारभाव मिळाला आहे.
दरम्यान जाणकार लोकांच्या मते कापूस दरातील ही तेजी पुढील काही दिवस कायम राहणार आहे. तसेच काही जाणकार लोकांनी पुढील एक ते दोन महिन्यात कापसाला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळणार असल्याचे सांगितले आहे. साहजिकच यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान शेतकरी बांधवांनी कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे कापसाच्या वाढीव दराचा शेतकरी बांधवांना कितपत फायदा होतो ही एक विश्लेषणात्मक बाब राहणार आहे.