Kapus Bajarbhav Update : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मकर संक्रांतीच्या पर्वावर एक अतिशय आनंदाची आणि गोड बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी कापसाला 9,000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत होता आणि कमाल बाजारभावाने साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठला होता.
मात्र डिसेंबर 2022 मध्ये कापूस दरात मोठी घसरण झाली. कापसाचे बाजार भाव साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आलेत. दरम्यान आता जानेवारीत यामध्ये वाढ होत होती. अनेक ठिकाणी कापूस दर 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते.
मात्र गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण होत आहे. अशातच आज कापूस उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज अकोला- बोरगावमंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. विशेष म्हणजे सरासरी बाजार भाव साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत.
निश्चितच हा कमाल बाजार भाव आहे जो की एक ते दोन शेतकऱ्यांना मिळाला असेल. मात्र काल-परवा आठ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास कापसाला सरासरी दर मिळत होता अशा परिस्थितीत सरासरी दराने साडेआठ हजार रुपयांचा टप्पा गाठला असल्याने कुठे ना कुठे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. तसेच भविष्यात दरात अजून वाढ होईल अशी आशा तयार झाली आहे.
मात्र राज्याच्या इतर बाजारात आजही कापूस दर दबावात होते, राज्यातील बहुतांशी बाजार समितीत कापसाला आज साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कमाल बाजारभाव मिळाला आहे तर सरासरी बाजार भाव 8200 प्रतिक्विंटलच्या आसपास होते. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात झालेल्या कापूस लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3600 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8320 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 123 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
आष्टी- वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 147 क्विंटल ए.के.एच.४-लांब स्टेपल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
घणसावंगी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 102 क्विंटल ए.के.एच.४-मध्यम स्टेपल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अकोला- बोरगावमंजू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 187 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8750 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 70 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.