Kapus Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कापूस दरात घसरण होत आहे. आज देखील दरात घसरण झाली आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचे दरवाढीची आशा तुर्तास तरी फोल ठरत असल्याचे चित्र आहे.
खरं पाहता गेल्यावर्षी कापसाला कधी नव्हे तो उच्चांकी बारा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. यामुळे यंदा देखील दरात चांगलीच तेजी राहील, या अनुषंगाने कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
मात्र यंदा कापूस उत्पादनात घट झाली आणि कापसाला गेल्यावर्षीप्रमाणे दर मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक कोंडीत सापडला आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस दराची माहिती जाणून घेणार आहोत.
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 550 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावा त्या एपीएमसी मध्ये कापसाला 8600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव आठ हजार 830 रुपये नमूद झाला आहे.
आष्टी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 642 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8400 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9000 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल तर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव आठ हजार 800 रुपये नमूद झाला आहे.
कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 613 क्विंटल हायब्रीड कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावा त्या एपीएमसी मध्ये कापसाला 8000 रुपये प्रति गुंटूर एवढा किमान दर मिळाला असून 9 हजार रुपये प्रतेक गुंतला एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8500 नमूद झाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 396 क्विंटल कापसाचे आवक झाली :- आज झालेल्या लिलावा ते एपीएमसी मध्ये कापसाला 8700 रुपये प्रति गुंटूर एवढा किमान दर मिळाला असून 8880 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 8800 नमूद झाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 300 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8800 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9120 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9000 रुपये नमूद झाला आहे.