Kapus Bajarbhav : यावर्षी कापूस हंगाम हा विजयादशमीच्या दिवशी सुरु झाला. विजयादशमीला सुरू झालेला कापूस हंगाम मोठ्या दणक्यात सुरू झाला होता. हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव खानदेशात नमूद करण्यात आला होता.
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातही कापसाला तब्बल 11 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा बाजार भाव सुरुवातीला पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर कापसाच्या बाजार भावाला ग्रहण लागलं आणि कापूस दरात मोठी घट झाली.
महूर्ताचा काही कालावधी वगळता कापसाचे बाजार भाव चांगले दबावात पाहायला मिळाले. गेल्या महिन्याच्या शेवटी कापसाला मात्र सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होत असून कापूस बाजार भाव दहा हजाराच्या घरात शिरला आहे. जाणकार लोकांच्या मते तेलबिया पेंड महागले असल्याने सरकी पेंड ची मागणी वाढली आहे.
यामुळे कापसाची देखील मागणी वाढली आहे. परिणामी कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होत आहे. याशिवाय कापड उद्योगात देखील आता चालना पाहायला मिळत आहे. उद्योगाकडून कापसाची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली असल्याने कापसाच्या दरात वाढ होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापूस दरात सुधारणा होत आहे.
साहजिकच यामुळे देशांतर्गत कापूस दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेल्या बाजार भावाविषयी सविस्तर चर्चा करण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया कापसाचे आजचे बाजार भाव.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एच-4 मध्यम स्टेपल कापसाची 84 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9150 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 9,050 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज लॉंग स्टेपल कापसाची 85 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 8800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाची 15 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव 9,051 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. तर 9025 रुपये एवढा सर्वसाधारण दर मिळाला आहे.