Kapus Bajarbhav : मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाच्या लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अकोट तालुक्याला कॉटन बेल्ट म्हणून ओळखले जाते. याच कॉटन बेल्ट मधून कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
कापसाच्या बाजारभावात अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी वाढ झाली असून कापसाला या हंगामातील सर्वोच्च बाजार भाव मिळाले आहेत. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळाली तसेच पिवळे सोने अर्थातच सोयाबीन बाजारभावात देखील मोठी वाढ झाली.
यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधव आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला तब्बल 9565 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून दहा हजाराच्या घरात गेला आहे. तसेच सोयाबीन देखील 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे.
मित्रांनो, या खरीप हंगामात मुख्य पीक कापूस आणि सोयाबीनला पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस समवेत सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता, तसेच यावर्षी पाऊस अधिक का लांबला असल्याने आणि परतीच्या पाऊसकाळात देखील अतिवृष्टी सारखा पाऊस बरसला असल्याने कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. शिवाय परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पीक पावसात सापडले, ऐन कापूस वेचणीच्या आणि सोयाबीन मळणीच्या हंगामात परतीचा पाऊस त्राहीमाम माजवत होता.
अशा परिस्थितीत सोयाबीनमध्ये आणि कापसामध्ये आद्रता अधिक होती. मात्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आणि रब्बी हंगामासाठी पैशांची उभारणी करणे हेतू शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करणे भाग पडले. अशा परिस्थितीत बाजारात आद्रता असलेल्या कापूस आणि सोयाबीनची अधिक आवक झाली. परिणामी अशा शेतमालाला कमी बाजार भाव मिळाला. दरम्यान आता कापसामधील आणि सोयाबीनमधील आद्रता हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारात कापसाचे आणि सोयाबीनचे दर वधारत आहेत. एकीकडे कापूस आणि सोयाबीन दरात वाढ होत आहे तर दुसरीकडे शेतकरी बांधवांनी आता दुसरा माइंड गेम खेळायला सुरुवात केली आहे.
मित्रांनो गेल्या हंगामा प्रमाणेच या हंगामात देखील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी साठवणुकीचा फंडा पुन्हा एकदा उपयोगात आणला आहे. मित्रांनो खरं पाहता आता सोयाबीन आणि कापूस दरात वाढ होत असली तरी देखील शेतकरी बांधवांनी अधिक दरवाढीच्या अपेक्षेने कापसाची आणि सोयाबीनची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
खरं पाहता व्यापारी वर्गाने सोयाबीन आणि कापूस दरात भविष्यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली असल्याने शेतकरी बांधवानी आता साठवणूकीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या हंगामात देखील शेतकरी बांधवांनी बाजारात सोयाबीन आणि कापूस कमी भावात विक्री होऊ लागला की साठवणूक करायची आणि बाजारात भाव भाव वाढ झाली की पुन्हा विक्री करायची असे समीकरण अंगीकारले होते. या हंगामात देखील शेतकरी बांधव असंच काहीसं करणार असून याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी खाद्यतेल आणि तेलबियांवरील असलेले स्टॉक लिमिट काढून घेतलं. यामुळे तेलबिया बाजाराला आधार मिळाला असून सोयाबीन दरात वाढ झाली आहे. तसेच कापसाच्या बाबतीत जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची आणि सरकीची मोठी मागणी वाढली असून बाजार भाव वाढत आहे.
अशा परिस्थितीत देशांतर्गत कापसाच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे. निश्चितच आता कापूस दहा हजाराच्या घरात गेला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून जाणकार लोकांनी भविष्यात कापसाला सरासरी बाजार भाव 9000 रुपये प्रतिक्विंटल च्या आसपास मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निश्चितच सरासरी बाजारभाव 9000 रुपये प्रति क्विंटल राहिला तर कमाल बाजार भाव 10 हजाराचा टप्पा पार करणार आहे आणि यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अजूनच दिलासा मिळणार आहे.